ओल्या सांजवेळी
ओल्या सांजवेळी
मेघ नभी दाटता...
हंबरल्या गाई...
गोठ्यात वासरांना...
भेट्ण्या ती घाई...
मंद शांत वारे...
वाहू लागले मनी...
उद्याची स्वप्न....
रुजवू पाहते नयनी...
भास ते सततचे...
हळव्या ओल्या क्षणांचे.....
नयन हे सुखावले..
पाहता मिलन क्षितिजाचे....
नित्य नवी पहाट...
दाखवी जीवनास वाट...
तोडून अवघे बंध, पाश..
तुडवीत चालली वादळवाट..
नको कुणाची ..
फसवी साथ...
घेतला हाती मी..
आता शब्दांचा हात...
मखमली स्पर्श शब्दांचा...
ह्या ओल्या सांजवेळी....
मन कातर कातर होई..
ह्या हळव्या कातरवेळी.....

