भेट ती अपूर्ण
भेट ती अपूर्ण
हसता हसता क्षण
डोळे भरून गेला...
क्षणिक भेटीचा तो
वियोग घेऊनी आला ...
नकळत दाटूनी आले
गैर समजांचे गडद धुके...
निपचित पडल्या भावना...
अन् शब्द झाले मुके ...
भेट न जाहली एकही...
पण अपूर्ण ती ठरली ..
का कंठाशी प्राण येऊन...
अव्यक्त भावना गहिवरली...
क्षण सुखाचे ते अनंत..
माझ्या भोवतालीच होते...
माझ्याच अंतःकरणी,पण
मला गवसले नव्हते ...
"भेट ती अपूर्ण"
अन् अपूर्णच ते नातं...
सुख ओंजळीत येऊनही..
मन का भासे रितं...
