सरते वर्ष
सरते वर्ष
सरत्या वर्षाचे
ओझरते दर्शन...
येणाऱ्या सालाचे
किती ते आकर्षण ...
हाच हर्ष,उल्हास..
वर्षभर टिकवू या...
समाधानाने जगून,दुसऱ्यास..
मनसोक्त आनंद वाटू या ..
कुणाच्या काळोख्या जीवनात...
आशेचा दिनकर उगवू या ...
मनातील उदासीनतेच्या तिमिराला कायमचं हद्दपार करू या ...
उद्या असेल तोच भास्कर..
पण किरणे मात्र नवी...
नव्यानं सुरुवात करण्याची...
जिज्ञासा मनी हवी..
