"मिलन सोहळा "
"मिलन सोहळा "
ओळखीचे भास, अन् ओळखीचेच श्र्वास
हवाहवासा वाटणारा तुझा रेशीम सहवास
तुझिया चाहुलीने श्रावणसरी बरसल्या
कवेत घेण्या त्यांना माझ्या भावना तरसल्या
अनपेक्षित वळणावर भेट तयांची होता..
हळुवार हातात हात घेतला,त्यांनी जाता जाता
मनातले भाव अलगद शब्दात टिपता..
भाव विभोर् त्यांच्या अर्थांची मोहकता
तुला भेटण्या चाले मनाची आतुरता..
प्राशन करून घेऊ किती,शब्दांची सुंदरता
शब्दाशब्दात माझा अडकला प्राण...
गुंतत गेले नकळत शब्दात मन हे अजाण..
शब्दांच्या संगतीने जीवन करते व्यतीत..
शब्दांत भावनाही व्यक्त होई आता सुरळीत
"मिलन सोहळा" हा नानाविध शब्दांचा..
तुझ्या माझ्या विलक्षण अनोख्या नात्याचा
"नाते अपुले "मनात घट्ट रुजत गेले...
भावनांना वाट दावित शब्दात मी भिजत गेले

