STORYMIRROR

Nalini Laware

Comedy

3  

Nalini Laware

Comedy

जुळे

जुळे

1 min
120

दोन जुळ्यांची गोष्टच न्यारी

 आपलेसे होती सर्वांना सारी

 एक रडके दुसरे हसरे

 एक लाजते दुसरे नाचते

 ठेवन शरीराची एक सारखी

 ओळखण्या ती नजर पारखी

 खोडी एकाने शिक्षा दुसऱ्याला

 खाऊ मात्र असे वेगवेगळा

 अभ्यासाचे तर  तंत्रच वेगळे

एक अभ्यासू नंबर दुसऱ्याला मिळे

 मित्रांची जास्त गरज न भासते

दोघेही एकमेकांचे काही कमी नसते

 प्रश्न एकाला देई दुसरा उत्तर

 प्रश्न उत्तरांची मैफिल सत्वर

मदतीला पुढे हात चार

 आईचा होई हलका भार

बाबांचे दोन मजबूत खांब

 गाठतील पल्ला लांबच लांब


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy