साडी...
साडी...
साडी म्हणजे बायकांचा
असे जीव की प्राण,
घरातील अलमारी म्हणजे
साड्यांचीच खाण.
सणा सुदीला साऱ्याच साड्या
नजरेस भासती नव्या,
देण्याची वेळ येता साऱ्या कशा स्वतःलाच हव्या.
चालते आम्हा लाल निळी
पिवळी अन हिरवी,
कोणत्याही रंगाच्या साड्या
नेसून अशा आम्ही मिरवी.
नवऱ्यांना वाटते साऱ्याच
साड्यांचा भरवावा सेल,
पण आम्ही मात्र करतो
ऑनलाईन साड्यांसाठी मेल.
कोण म्हणतं खरेदीला
मार्केट मध्येच जावं लागतं,
हल्ली घरबसल्याही
सारं काही मिळतं.
नको ती गर्दीत फिरायची कटकट,
अन नको ती दुकानदाराची ऐकायला वटवट.
म्हणूनच आम्ही घेतोय
ऑनलाईन खरेदीची मजा,
नवऱ्याला देतोय
बील भरण्याची सजा.
महिन्या दोन महिन्यात
नक्कीच एक तरी मागवतो,
अन दुसऱ्यांनाही
मागवायला भाग पाडतो.
