आंबाप्रेमी (बडबड गीत)
आंबाप्रेमी (बडबड गीत)
कुणाचं ठाऊक कसा
पण फ्रिज मधुन गायब झाला आंबा असा
दिदी म्हणते मी नाही खाल्ला
चिमु म्हणते मी नाही पाहिला
जणु गुडुप झाला जसा
कुणाचं ठाऊक कसा
पण फ्रिज मधुन गायब झाला आंबा असा...
दिदी म्हणते मांजरीने खाल्ला
चिमु म्हणते उदराने पळवला
की पाय फुटुन तोच पळाला
कुणास ठाऊक कसा
पण फ्रिज मधुन गायब झाला आंबा असा...
मम्मी ने मग बारीक लक्ष ठेवले
एक दिवस आंबा चोराला पकडले
दबक्या पावलांनी हळुच ती येते
गुपचुप फ्रीज मधुन आंबा काढते
चोरुन गच्चीवर जाऊन मिटक्या मारत आंबा खाते
एकच आहे घरात ती आंब्याची प्रेमी
आमची छोटीसी चिमु ताई
आज सर्वांना कळुन चुकले
कुणास ठाऊक कसा पण
फ्रिज मधुन गायब व्हायचा आंबा असा...
