"भुते "
"भुते "
काय वेळ आली माणसा
तूला भुताशी गप्पा
मारायची वेळ आली
कारण माणूसच बनलाय भुत !
काय वेळ आली माणसा
तु माणसालाच बनवलय भुत
साऱ्या भावभावनाचां
मोबाईलवर आला ऊत
कारण माणूसच बनलाय भुत !
काय वेळ आली माणसा
शेजारी बसून दुरच्याशी मारता गप्पा
उठता बसता चांटिंगला येतो ऊत
कारण माणूसच बनलाय भुत !
काय वेळ आली माणसा
पारावर कटच्यावर जणु बसलीय भुते
सेल्फी ,रिल इमेज यांचा आलाय ऊत
कारण माणूसच बनलाय भुत !
