शाळेचा पहिला दिवस आणि आई
शाळेचा पहिला दिवस आणि आई
शीर्षक- शाळेचा पहिला दिवस आणि आई 📲
शाळेचा पहिला दिवस, मुलं शाळेत आता जाणार
घरात वाटणार सुनसून, मी एकटी कशी रहाणार
भरभर काम करून,बसणार एका कोपल्यात
बरेच दिवसापासून मोबाईल,घेतला नाही हातात
मोबाईल घेतला हातात,अन ऑन केला आता
बघावं खूप सारे गेम्स, सारे गेमचेच अँप त्यात
थोडं म्हटलं आता, आपण गेम खेळून बघावं
खेळता काही येईना, आता कोणाला विचारावं
मोबाईल ठेवला बाजूला,मनात एक विचार आला
मुलांन जवळ बसून गेम,शिकून घ्यायचा होता थोडा
विचार करता करता, माझी मुलं आली शाळेतून
हातपाय धुऊन, बसली हातात मोबाईल घेऊन
मी म्हटलं बेटा, थोडा मला पण मोबाईल शिकवा
मोबाईलवर गेम खेळून, निघणार माझा थकवा
मुलं म्हणाले आई, मोबाईल तुला 'खराब' करणार
स्वयंपाक सोडून तू, फक्त गेमचं गेम खेळणार
मुलगा म्हणाला आई, तुला खूप बाबा ओरडणार
एकदा सवय झाल्यावर, मग सवय नाही सुटणार
मुलगी म्हणाली मोबाईल, तुझ्या भीतीमुळेच देते तुझ्या हातात
पण, तुला कोण ओरडणार, अगं 'बाबा' तर तुला भितात..
मुलांचं म्हणणं तसंही, चुकीचं काहीच नव्हतं
त्यापेक्षा मोबाईल न बघता, दुपारी झोपणं योग्य होतं
मोबाईलला ठेवते आता, स्वतःपासून सतत दूर...
घरातली काम झाल्यावर, दुपारी झोप घेते मी भरपूर...
