STORYMIRROR

Prashant Bhosale

Comedy

3  

Prashant Bhosale

Comedy

बायको रुसली

बायको रुसली

1 min
219

नवऱ्याचा डबा करायला 

ती भल्या पहाटे उठली, 

अर्ध वट झोपेतच

तिनं चपाती लाटली

वाकडी तिकडी चपाती पाहून 

माझी एकदम सटकली ,

रुसली ..रुसली माझी बायको रुसली

गोरी नाही मिळाली म्हणून ,

मी रंगाने सावळी केली

दोन दिवसात संपवते

ती पावडर आणि लाली

रंगावरुन जरा तिची 

चेष्टा मी केली, 

रुसली ...रुसली माझी बायको रुसली

सुंदर दिसण्यासाठी ,

ती पार्लर मध्ये गेली

फेसीयल कोणतं करावं 

यानेच ती गोंधळून गेली

घरीच आय ब्रो करताना 

भुव ई तीची सुजली

रुसली ...रुसली माझी बायको रुसली

तीचा रुसवा घालवण्यासाठी 

मी एक शक्कल लढवली 

तीच्या आईला मी

 माझ्याच घरी बोलावून घेतली

काय चमत्कार झाला बघा

आईला पाहून 

ती खुदकन हसली 

हसली...हसली माझी बायको हसली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy