Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Prashant Bhosale

Abstract Tragedy

4.0  

Prashant Bhosale

Abstract Tragedy

महामारीची सांगता....

महामारीची सांगता....

1 min 277 1 min 277

सगळं बंद असताना,एम्बुलन्समधील स्ट्रेचर वर दाटीवाटीने बसून

कोविड केअर सेंटर पर्यंत पोहण्याची माझी धडपड कोणाला का दिसली नाही. 

मला तर करायची होती या महामारीची सांगता....

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी निपचित पडलेल्या

माझ्या कोविड ग्रस्ताचा श्वास गुदमरतोय हे कोणाला का दिसले नाही.

मला तर करायची होती या महामारीची सांगता....

माणुसकी नसलेलं रक्त मला वेगळे करायचे होते मग

माणुसकी विसरलेली रक्ताची नाती कोणाला का दिसली नाही.

मला तर करायची होती या महामारीची सांगता....

काळी बुरशी नंगानाच करत असताना

शेवाळलेल्या मनाला स्वच्छ करायचे कोणाला का दिसले नाही.

मला तर करायची होती या महामारीची सांगता...

लसीकरणाच्या चालू असलेल्या राजकारणामुळे

कित्येकांची जीवनज्योत मावळलेली कोणाला का दिसली नाही.

मला तर करायची होती या महामारीची सांगता....

मला लाख करु देत कोविड योध्दा म्हणून सन्मानित

म्हणून नियमच धाब्यावर बसवणारे कोणाला का दिसले नाही.

मला तर करायची होती या महामारीची सांगता.....

Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Bhosale

Similar marathi poem from Abstract