STORYMIRROR

Prashant Bhosale

Abstract

3  

Prashant Bhosale

Abstract

आतड्यांचा फास

आतड्यांचा फास

1 min
172

बाबा ..माझं लग्न का ठरवताय?

तुम्ही ही न पाहिलेल्या आणि

मी ओळखत नसलेल्या मुलासोबत

बाबा..माझं लग्न का ठरवताय?

श्रीमंतीचा माज आणि गरीबीची

लाज वाटणाऱ्या मुलासोबत

बाबा..माझं लग्न का ठरवताय?

पुरुषप्रधान संस्कृती जपण्यासाठी 

पावलोपावली स्रीत्वाचा अवमान करणाऱ्या मुलासोबत

बाबा..माझं लग्न का ठरवताय?

मी स्वतः निर्व्यसनी असताना व्यसनाधीन मुलासोबत

बाबा..माझं लग्न का ठरवताय?

सोशल मिडीया वर फेक अकाउंट काढून 

अनेक निष्पाप मुलींना फसवणाऱ्या मुलासोबत

खरं सांगते बाबा नका ठरवू माझं लग्न 

त्या गाव गुंडासोबत..

बाबा..मला राहायचं आहे स्वतः च्या पायावर 

खंबीरपणे उभा ,

तुम्ही दिलेल्या पंखातील बळाने

घयायची आहे आकाशात उंच भरारी 

आणि करायची आहेत तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्न 

पुरी

बाबा..तरीही ठरवणारच असाल माझं लग्न 

तर मला, 

 आईच्या गर्भातच का नाही दिला 

आतड्यांच फास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract