प्रतिमा तुझी
प्रतिमा तुझी
*विषय:- तुला आठवता*
*शीर्षक*- प्रतिमा तुझी*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
पेन हाती घेत
कविता लिहिली
आठवता तुला
शब्द उतरली...!!1!!
शब्दाचा हा खेळ
असतो तुझाच
अक्षरांचा भास
छळतो मलाच...!!2!!
सुप्तकला माझी
कागदात असे
प्रतिमा तुझीच
त्यामधून दिसे.....!!3!!
सोने जसे रूप
अक्षर लिहितो
रोज तुला सखे
स्वप्नात पाहतो....!!4!!
अक्षरे मिळून
शब्दांत गुंफली
रचूनिया शब्द
काव्यात सजली...!!5!!
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*बालकवी :- राहुल विनोद कांबळे*
*मु. बोरिसिंह पोस्ट :- रुई (वाई )*
*जिल्हा :- यवतमाळ*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
