STORYMIRROR

Surekha Nandardhane

Comedy Others

3  

Surekha Nandardhane

Comedy Others

ज्योतिषी

ज्योतिषी

1 min
124

  ज्योतिषी


नवखा ज्योतिषी

 आला काल दारात

नको नको म्हणता

येऊन बसला घरात ….


भविष्य सांगतो खरं

करू लागला आग्रह

तुमच्या राशीत बघतो

कोपला का कोणता ग्रह ….


पैसा येईल घरात

सुख आहे भाग्यात

ऐक ऐक शब्द खरा

राहू दया ध्यानात ……


चालून येईन राजयोग

व्हाल तुम्ही महाराणी

हजार रुपये द्या सांगतो

पुढची भविष्यवाणी ….


कानमंत्र देतो मी 

नवरा ठेवा मुठीत

उपवास करा सोमवार

नजर ठेवा बारीक ….


बोल बच्चन ऐकून

पैसे दिले हजार

भुरळ पाडून मला

पैसे घेऊन झाला पसार ….


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy