नशीबवान...!
नशीबवान...!
नशीबवान आपण जीवन
समजून घेणारी संस्कृती लाभली
पहा जाता जाता
आपली कविता सर्वांनी वाचली
रात्री नंतर दिवस उगवतो
हा नियतीचा खेळ आहे
विधात्याच्या हाती सारा
जीवन जगवण्याचा मेल आहे
एकदाच म्हणा हरी हरी
पहा ऐकू येईल डोन्ट वरी
हीच जीवनाची गम्मत खरी
गोड लागते श्रमाची ती भाकरी
भित्यापाठी ब्रम्ह राक्षस
हे काही खोटे नाही
भय जाता जीवनाचे
तो विधाता आल्यावाचून रहात नाही
अनुभवाचे बोल बाबा
कथीले मोठ्या प्रेमाने
हवीतर घ्या प्रचिती
जाता जाता भजुनी त्याला भक्तीने..!
