हल्ली माणसं
हल्ली माणसं
हल्ली माणसं नाही कागदच बोलतो
अन् प्रेमाची भाषा कुणाला कळते ?
जो तो उठतो कायदा शिकवतो ...
सगळेच प्रश्न कायद्याने सुटत नसतात रे
या दीडशहाण्यांना कुणी सांगावे ?
प्रेमाने जगही जिंकता येत ?
कायद्याची भाषा कागदाला कळते
अन् प्रेमाची भाषा माणसाला इतकं साधं गणित असतं
मायबाप सरकारला कोण समजवणार ?
त्यांना तेच हवं फक्त राडा राडा आणि फक्त राडा
अरे कायद्याच्या बडग्याने जग सुधारले असते तर
हिटलर , मुसोलिनी घराघरात पूजले गेले असते
त्यांना मिरवायचे नाही तर पेटवायचे आहे हे नक्की गड्यांनो !
त्याच्यावरच त्यांच्या राजकीय पोळ्या भाजणार आहेत ..,
कळकळीची विनंती तुम्हा भावांनो !कुत्र्यामांजरागत मरू नका
रंग रूप वेष भाषा जरी आपुली वेगवेगळी, आपण सारे फक्त भारतीय
जात, धर्म, वंश कधी आपुल्या एकात्मतेच्या आड आला नाही गड्यांनो
पुढेही येणार नाही दक्षता घ्या... स्वार्थी राजकारण्यांचे प्यादे बनू नका ...
संत महंतांची महान परंपरा, फुले शाहूंची विचारधारा कधीच विसरू नका
प्रसंग आहे बाका.
तरुन जाऊ पुन्हा एकदा दाखवून देऊ श्रेष्ठत्व आपुले
हिंसा, जाळपोळ, थयथयाट करून काहीच हाती येणार नाही भावांनो !...
इतके दिवस थांबलात अजून थोडा काळ धीर धरा. होईल सर्वकाही ठीक
शिवरायांचे मावळे तुम्ही गनिमी कावा का बरं विसरलात ?
आता शांतता राखा, चूका सुधारा न्यायदेवतेवरील विश्वास ढळू देऊ नका...
