STORYMIRROR

Supriya Devkar

Horror Tragedy

3  

Supriya Devkar

Horror Tragedy

धन्यवाद करोना

धन्यवाद करोना

1 min
323

हत्ती गेला शेपूट राहिले

नको नको ते करोनामुळे पाहिले

घरात राहूनही या जगाने

भीतीचे ओझे मानगुटीवर वाहीले


करोना किती दिलदार बघा

सोडले नाहीच कोणाला

बाई बाप्या जनावरेही

विसरले नाहीत मास्कला


सोशल डिस्टन्स ची किमया न्यारी

 घाबरून गेली जनता सारी

हात जोडून राम राम करता

गळाभेटीला मुकली सारी


वारी चुकली जत्रा हुकली

ऊरूसही पडले बंद

गाभाऱ्यातील देवही झाले

 भिंतीआड जेरबंद


दिवसामागून वारे फिरले

चेहऱ्यावरले हासु विरले

चटका लावत जिवलगांचे

आयुष्यही अवचित सरले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror