STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

3  

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

ब्युटीपार्लर जिंदाबाद...

ब्युटीपार्लर जिंदाबाद...

1 min
183

आई सोबत आज म्या ब्युटीपार्लरमध्ये गेलो 

तितचे सगळे भूत पाहून मी तात्काळ पळालो 

काही होते तिथ डोळयांवर काकडी लावून 

तर काही होते भाज्याचा लेप माऊन 


मले वाटल म्या आलोय भाजी मंडीत 

होते सगळे थोबाडीत लावून टमाटर न भेंडी 

मले थोडं आता समजलं कावून वाढली महागाई 

कारण सगळं भाजीच येते ब्युटीपार्लर च्याच ठाई 


म्या ते सगळं पाहून जास्तच घाबरलो 

म्हणून लगेच ब्युटीपार्लरच्या बाहेर आलो 

बाहेर येताच घेतला थोडा मोकळा श्वास 

अंदर चे थोबाड पाहून होत होते भूतांचे भास 


ब्युटीपार्लरच्या बाहेर होता एक पाणीपुरी वाला 

बनवल्या दोन प्लेट अन खाल्ल्या भेल साऱ्या 

म्या भेल खात असताना तिथं आल्या दोन पोरी 

म्हणे दोस्ता बनव दोन भेल न कचोरी 


मले त्यातली एक पोरगी जरा जास्तच आवडली 

होती लयी गोड जशी पहिल्या प्रेमाची सावली 

म्हणून म्या तिले आता पटवाचच ठरवलं 

कारण तिले हृदयाच्या ओळीत म्याच गिरवल 


म्हणून म्या काढला माया मोबाईल भारी 

वाचला जोऱ्यात व्हाट्सअप जोक अन तारी 

पोरगी ते जोक ऐकून खिदीखिदी हसली 

म्या म्हटलं आता हे माया प्रेमात फसली 


तिची दुसरी मैत्रीण होती तिच्या सोबत

म्या पुन्हा वाचला माया जोक थोडा मोफत 

दोघीही आता पुन्हा थोडया जोऱ्यात हसल्या 

म्या म्हटलं या दोघी माया हृदयात बसल्या 


हळूहळू आता ऊन लयी वाढली 

पोरीच मेकअप उतरावू लागली 

माय मन थोड आता जास्तच घाबरल

कारण त्या दिसें जश्या भूतीन च बारस 


एक गोष्ट मात्र आता चांगलीच रुचली 

ठसून ठसून ते माया मनाले पटली 

ब्युटीपार्लरची राव कृपाच भारी 

नाहीत असती ही दुनिया भयानक सारी 


आता मले कळली, सगळी गोष्ट समजली 

का असते ब्युटीपार्लर अन् पोरींची दोस्ती 

म्हणून म्या बी म्हटलं, मानतो आता अफाट 

ब्युटीपार्लर जिंदाबाद ब्युटीपार्लर जिंदाबाद. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy