STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

बापू तुमच्या देशात

बापू तुमच्या देशात

1 min
916



कुणी घेतं झेंडा जातीचा

कुणा हाती दांडा बरबादीचा

मर्जीचे मालक आम्ही सगळे

आता आम्ही संधिसाधू बगळे

बापू तुमच्या देशात ...


कशाला हो तुम्ही देश स्वतंत्र केला?

गुलामीची सवय आम्हास ...

गुलामीचा करणार , असेच मरणार

बापू तुमच्या देशात ...


काय फरक पडला बापू

फिरंगी अन ह्यांच्यात

एकतेची टिमकी वाजवत

तुम्ही मात्र नाहक मेलात

बापू तुमच्या देशात ...


तू चोर मी शिपाई चाललंय

मी साव, तू हरामखोर इथे

लढाई अशी रंगलीय

आता लोकशाहीच पांगलीय

बापू तुमच्या देशात ...


काही हि म्हणा बापू तुमचं चुकलंच ...

वाऱ्यावर सोडून अचानक गेलात

तुमचं बलिदान व्यर्थच, अनाथ आम्हास केलात

सत्तरीत स्वराज्याच आम्ही काय केलं ?

बापू तुमच्या देशात ...


अहिंसा मूलमंत्र का तुम्ही सोबत नेला

जायचंच होत तरस्वप्नच का दाखवलीत ?

स्वराज्य बहाल करून तुम्ही नामानिराळे झालात

आम्ही मात्र भ्रमिष्टासारखे अजूनही भांडतोय ....

बापू तुमच्या देशात ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational