या मित्राविना
या मित्राविना
अर्थपूर्ण बनविती आयुष्याला
नशीब लागते साथ मिळायला
रंगत नाही येत कधी यांच्याविना
जिंदगी भासते फिकी या मित्राविना … !
एकट्याचे जगणे नसावे हो कधी
मैत्रीची बाग असावी सुंदर - साधी
फुले जशी तऱ्हेतऱ्हेची, तसे मित्र नाना
जिंदगी भासते फिकी या मित्राविना … !
उत्तुंग - उदात्त मैत्रीचे दाखले किती
जगभरातले मित्र आपुल्यास देती
मैत्री कृष्ण - सुदाम्याची, पार्थ - कान्हाची
हृदयंगम मैत्री - नाते, त्यातील भावना
जिंदगी भासते फिकी या मित्राविना … !