माझी मुलगी माझे सर्वस्व
माझी मुलगी माझे सर्वस्व
सर्वस्व केले तिला अर्पण
अर्पण केल्यावर हात रिते
रिते पण होते दूर जेंव्हा
जेंव्हा गातो अंगाई गीते
गीते गाताना ती हसते
हसते कधी अबोला धरते
धरते बोट माझे अन्
अन् घरभर बागडते
बागडते खेळते तिचा खेळ
खेळ खेळ भांड्याचा मांडते
मांडते घरभर पसारा करते
करते स्वयंपाक सर्वांना वाढते
वाढते लेक होते मोठ मोठी
मोठी स्वप्न तिच्या पावली
पावली व्हावीत पूर्ण कधी
कधी मुला परी देते ती सावली
सावली दोन्ही घराची ती
ती लेक माझीच व्हावी
व्हावी ती माझीच आई
आई मला तिच्यात दिसावी