॥ विजयादशमी ॥
॥ विजयादशमी ॥
नवरात्रींच्या नऊ दिवसांचा सण
विजयाचा क्षण, दसरा आला पण
देवीला रोज वहात होतो विजयाची माळ
वेणी ओटी भरावयाची आस मनी
भरला देवीला हिरवा चुडा, पायात पैंजण जोडवी,
मांगल्याच्या खुणा देवीचे रुप आगळेवेगळे,
बघावयासे वाटते पुन्हा पुन्हा
धुवायचे चरण अत्तराने, बस चौरंगावर
करते थाट पुरणपोळी नैवेद्याचे ठेवले ताट
कपाळी लावते हळदीकुंकू हो प्रसन्न,
दे आशीर्वाद नित्याने रोज करतो आरती
तुझ्या पुजनात मग्न होते सारी धरती ॥