STORYMIRROR

Arun V Deshpande

Abstract Others

2  

Arun V Deshpande

Abstract Others

भाव मनीचे

भाव मनीचे

1 min
13.7K


जुळवाजुळवी ती शब्दांची 

सोपी असते ?, मुळीच नाही 

असेल समजदार समोरचा 

काही खात्री देता येत नाही…!

सांगणे आपले तसे कुणा 

कधी रडगाणे ना ठरावे 

काय सांगावे ,नि काय नाही 

हे ज्याचे त्यानेच ठरवावे …!

बोजड अपेक्षांचे ते ओझे 

आत साठवणे बिनकामी 

समोरच्याच्या मनात प्रतिमा 

नसावी कधी ती कुचकामी …!

भाव भावना व्यक्त करणे 

ओढ असते हरेक मनाची 

आठवणी असतात याच्या 

गुंतवणूक हो हीच मनाची …!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract