STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Tragedy

3  

Gaurav Daware

Drama Romance Tragedy

विरंगस प्रेम...

विरंगस प्रेम...

1 min
194

विरंगस असत प्रेम अन

         विरंगत त्यातील भावना 

मनाच्या अबोलीत लपलेल्या 

         नको असलेल्या या यातना ........


शब्दाच्या जाळ्यात सापडतात

          हृदयाच्या असंख्य ज्वाळी

नको असलेल्या प्रेमाला

           आता का बर सुचल्या या ओळी....


लपवत लपवत फिरले मी

           घेऊन ती दुःखाची अबोल भावना

त्याला मिळालेल्या नवीन प्रेमाचे

           दुःखही माझ्या काळजात मावेना....


ओळी आताही सुचतात प्रेमावर

           थोडया विरंगस आणि मात्र भरपूर

पण कोणासाठी लिहून मी या ओळी

           याच उत्तर मिळतच नाही हो पुरेपूर....


त्याच प्रेम होते खोटे मोती

          हे मला का आजच वाटे

त्याच्या प्रेमात असतांना मात्र 

          दुःखही जणू माझ्या ओळींचे साठे....


त्याला नवीन प्रेयसी भेटताच 

         चिडले मी भरपूर स्वतःवर

पण प्रेमाची चूक

        मला मात्र कळतही नाही आजवर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama