वेदना
वेदना
वेदनेने हात माझे पोळले
ओंजळीतही ते मावेना
नको ती दुखरी वेदना
आगीने श्वास माझा कोंडला
सुटता सुटेना काजळी
अजूनच पसरली हाती
काळ्या काळ्या वेदनेची
हस्तरेखांवर उमटली निशाणी
मी खूपच प्रयत्न केला तरी
पिच्छा वेदनेने सोडलाच नाही
मी काळजीने हातांना पाहिलं
हात तर भिजले वेदनेच्या रंगानी
मीही त्या पासून सुटण्यासाठी
चालवली पराकाष्ठा प्रयत्नांची
सोड म्हटलं वेदनेला सहन होईना
मी शेवटपर्यंत असेन उत्तरली वेदना