STORYMIRROR

Manoj Joshi

Drama Fantasy Tragedy

2  

Manoj Joshi

Drama Fantasy Tragedy

वाडा चिरेबंदी

वाडा चिरेबंदी

1 min
15K


वर ओढ्याच्या किनारी

माझा वाडा चिरेबंदी

त्याला दु:खाची दारं खिडक्या

त्यात सुख जायबंदी


अंगणातली हिरवी तुळस

सारीच करपून गेलेली

तोरणातली आंब्याची पानं

काही गळलेली अन वाळलेली


दरवाज्याचा सोनेरी रंग

जूना - पूराना दिसतो आहे

खिडकीतली दाट जळमटं

कधी येणार? पुसते आहे


परतूनी ये रे घराला

बोले आजीची मोडकी काठी

आजी गेल्या नंतरची

तीच्या एकटेपणाची साठी


आई बाबांचे कौलारू छप्पर

मोडकं - पडकं झालेलं

भाऊ - बहिणींची ही आधार खांब

वाळवीने पोखरून टाकलेली


परसातली आंबा फणसं

सारी वांझ झालेली

सरणावरची पडकी विहीर

जीव कंठत आटलेली


चिरेबंदी वाडा माझा

दु:खाने विझून गेलेला

माझी वाट पाहून - पाहून

तो ही थकलेला - कंबरेतून वाकलेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama