ऊसतोडणी
ऊसतोडणी
ऊसतोडणी ती
पहाटेच्या वेळी
कोयत्याचा वार
हातपाय सोली ॥१॥
ऊसतोडणी ती
ठेकेदारी पाही
गुलाम म्हणून
बांधलो दावणी ॥२॥
ऊसतोडणी ती
टायरची गाडी
बैलच कष्टती
मालका सोबती ॥३॥
ऊसतोडणी ती
ओढ जाण्या घरी
रस्त्यावर अशी
परवड व्हावी ॥४॥
ऊसतोडणी ती
कंबर मोडणी
जोडीदारीण ती
कासरा न सोडी॥५॥
ऊसतोडणी ती
होई संसाराची
ओझे खांदयावरी
जू तुटत राही ॥६॥
