STORYMIRROR

Neelima Deshpande

Comedy Others

3  

Neelima Deshpande

Comedy Others

तू, मी आणि चहा

तू, मी आणि चहा

1 min
599

तू माझ्या आयुष्यात आलीस तेच मुळी चहाच्या कपासोबत...

तू , मी... आणि 

आल्याचा चहा...


तुझ्यासवे रातभर पाहिली अनेक स्वप्नं जागून आणि नाजूक बोटांनी गिरवली अक्षरं भविष्यासाठी वाकून


आयुष्यातले अनेक पावसाळे पाहिले मग आपण एकत्र;

दरवेळी बदलत अन् बहरत गेलेलं रुप तुझं बघून फुलून उठली माझी शिणलेली गात्रं


दिलीस साथ मज तू 

मनापासून आजवर

मुळ्या माझ्या रोवल्यास दरवेळी आणखी खोलवर


हवी हवीशी तू जी 

पाडते पैलू जीवनाला 

हे परीक्षा देवी मम

लाखो दंडवत तुजला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy