तरुणाई
तरुणाई
हाकेला तव साद जोडाया
सज्ज आमुचे सगेसारथी
हातामध्ये हात गुंफूनी
धडपडते ही तरुणाई....
अत्याचारी अमानुषतेला
विरोध आमुची तरुणाई
अन्यायाला दोन हात मग
दाखवी आमुची तरुणाई....
जातीधर्मावर जो जो घसरला
त्याला जबाब ही तरुणाई
अबलेचा हक्क बनूनी
सबलीकरण ही तरुणाई....
उजाड उनाड ह्या रानोमाळी
फुलवी बहर ही तरुणाई
अनाथांची अन निराधारांची
मायमाऊलीही तरुणाई.....
इतिहासाचे स्मरण आदर
गौरवशाली तरुणाई
बलिदानाला नमन आणि
शहीदबंधूंची तरुणाई.....
साक्षरतेचा आग्रह आणि
व्यसनमुक्तीची तरुणाई
लेखक,वाचक अभिनेत्यांची
कलेकलेची तरुणाई.....
ध्येय गाठण्या जिद्द बाळगी
यशायशाची तरुणाई
स्वप्न उद्याचे जिंकायाचे
नवं संकल्पनांची तरुणाई...
भ्रष्टाचारी,देशद्रोह्यांवर
पहार आमुची तरुणाई
गोरभूकेल्यांचा ती घास
पंगूंचा आधार तरुणाई....
नवविचार विवेक भाषण
एकात्मतेची तरुणाई
आनंदी,नवचैतन्याची
समभावाची तरुणाई.....
विविध रंगी विविध अंगी
एका छत्राची तरुणाई
भारतभूचे बळ हे सारे
भारतभूची तरुणाई.....
