तरंग...
तरंग...
संथ पाण्यावर
तरंग उठतात
काहीच वर्तुळं
काठावर येतात
तरंग उठायला
टाकावे लागतात खडे
तळ मात्र गाठतात
अगदीच थोडे
एवढ्याशा खड्याचे
असते केवढे बळ?
वलयाने तरंगांच्या
ढवळून निघतो तळ
खडा असा टाकावा
गढूळ न व्हावे अंतरंग
तळ नाही गाठला तरी
मनात उठावा तरंग