STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy Others

3  

Shila Ambhure

Fantasy Others

तीळ गुळ

तीळ गुळ

1 min
702


लहानसा तीळ एक

सोबतीला मित्र कैक


चालू लागले थाटात

आता पोचले घाटात


चालून सारे थकले

विसाव्यासाठी बसले


त्यांना वाजली थंडी

शोधू लागले ते बंडी


सारे पाहिले गुळाने

बोलला जरा वेळाने


सारेजण मैत्री करू

सोबतीचा हात धरु


गुळ सांगतो ऐटीने

तीळ आनंदले भेटीने


सर्वांची झाली दोस्ती

खुप केली दंगामस्ती


असे झाले एकरूप

बदलले त्यांचे रूप


गोड लाडू झाला छान

संक्रांतीला मिळे मान


लाडू हाच तुम्हाला दिला

'तीळ गुळ घ्या गोड बोला'


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy