STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Children

3  

Ganesh G Shivlad

Children

स्वप्नांचे ओझे

स्वप्नांचे ओझे

1 min
268

शिकवून मोठं करावं पोराला, 

स्वप्न थोर होते बापाचे,

ध्यानीमनी अन् रात्रंदिनी, 

ओझे त्यानेच वाहिले स्वप्नांचे..!


काम करून घाम गाळून, 

झुकला त्यासाठी कष्टानं,

स्वप्न फक्त पोराच्या हिताचं, 

पाहिलं केवळ बापानं..!


उभ आयुष्य स्वतःचं, 

त्यानं पोरासाठी झिजवलं,

ऐतखाऊ अवलादीनं मात्र, 

नुसतं बसून जिरवलं..!


हे हवे अन् ते हवे म्हणत, 

पोरानं मारली फुकट मजा,

हातचं राखून पोटाला मारून,

बापानं केवळ भोगली सजा..!


पोटच्या पोरासाठीच त्या, 

बापानं केलं जिवाचं रान,

पण नादान पोरगं निघालं, 

कुजून वाया गेलेलं वाण..!


म्हातारपणी मिळेल सुख, 

रंगवलं स्वप्न बापानं मोठं,

पण करणार काय शेवटी जर, 

नाणंच निघालं आपलं खोटं..!


स्वप्नांसाठी झुरला बाप,

केलं रक्ताच पाणी पाणी,

फिरलं पाणी स्वप्नांवर अन् ,

गेली वाया ती जिंदगानी..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children