STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

​ससुल्याचे आईस क्रीम शॉप

​ससुल्याचे आईस क्रीम शॉप

1 min
272

आईस क्रीम शॉप छोटेसे

होते भित्र्या ससुल्याचे,

स्ट्रॉबेरी मँगो पिस्ता

फ्लेवर होते दहाबारा


पहिली आली चिऊताई

म्हणते एक कोन द्या,

दुसरा फ्लेवर मला नको

हवा फक्त व्हॅनिला


नंतर आले बदकोबा

घेऊन त्यांच्या पिल्लाना,

मँगो कॅण्डी आहे ना

एक एक द्या सगळ्यांना


तिसरा नंबर माऊचा

मलई कॅण्डी हवी तीला,

एकच कॅण्डी मला नको

चार तरी हव्या मला


नंतर आले माकडोबा

घेऊन पिल्ले पाच सहा,

भीती दाखवून ससुल्याला

दुकान केले साफ पहा


आईसक्रीम शॉप बंद झाले

ससोबा पळून गेले

ससोबा लपले झुडपात,

दुकान गेले कुलुपात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy