STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

3  

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

गुपित सोन्याच...

गुपित सोन्याच...

1 min
205

आज घडला एक चमत्कार थोडा भारी

मले सापडली एक सोन्याची खान मस्त सारी

असं वाटत होत हे सांगाव कोणालेतरी

म्हणून माया गर्लफ्रेंडले मी फोन लावला लवकरी


मंग गर्लफ्रेंडले सांगितली हकीकत सारी

गर्लफ्रेंड म्हणे हे सोन्याची खान हाय कुठवरी

मलेबी सांग मी बी येते तिथं भरभरी

लुटून नेऊ सोन अन ऐश करू सारी


म्या म्हटलं 'शेवंते तु लवकर ये इथवरी

पण एक गोष्ट चांगली ध्यानात ठेव सारी

या खानिबद्दल कोणालाच सांगू नको थोडतरी

नाहीतर होईल वांदे अन नाही होईल चोरी' 


म्या मंग तिले ऍड्रेस देऊन बोलवलं लवकरी

ते आली लवकर पण आणल्या पाच सात पोरी

म्हणे 'या माया मैत्रीण इथं सेल्फी घ्यायला आल्या सारी

सेल्फी घेऊन या चालल्या जाईल आपआपल्या घरी' 


म्या म्हटलं 'शेवंते तु हे केल नाही बरी

आता याची माहिती लवकर पसरेल जगवारी

कारण या पोरी गोष्ट पसरवेल दुनियावरी

अन मी जाईल जेलात अन तु तुया घरी'


शेवंते म्हणे 'तु टेन्शन नको घेऊ थोडतरी

पोरी कधीच गुपित सांगत नाही सारी

या बी पोरी कोणालाच सांगणार नाही काहीतरी

कारण पोरीनं केलेलं प्रॉमिस निभावतात सारी'


हे एकूण मी तिच्याकडं पाहत राहलो अलवारी

पोरी गुपित सांगत नाही ही गोष्ट खरी कितवरी

कारण मी सांगितलं गर्लफ्रेंडले सोन्याच थोडतरी

अन तिनं पसरवाली मैत्रिणीत मायी गोष्ट सारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy