अरे अरे कोरोना...
अरे अरे कोरोना...
कोरोनाची परिस्थिती आहे खरी महामारी
त्यापासून सावध आपली पहिली खबरदारी
कोरोनाची बातमी असेल चिंता वाढवणारी
पण लस घेऊन दाखवू कोरोनाला दुनियादारी
कोरोना आधीपासूनच थोडा आहे कलाकारी
नवे नवे लक्षणे दाखवून भांबवून टाकतो सारी
पण त्याला नाही माहित माणूस आहे अविष्कारी
कितीही मोठी बिमारी तरी त्यावर उपाय काढतो थोडातरी
अरे अरे कोरोना तू असेल कितीही भूभूत्कारी
पण तुला नसेल माहित माणूस आहे अलंकारी
चुकी केली रे तु येऊन आमच्या जगात सारी
आता मनुष्य दाखवेल तुला तुझी खरी औकात भारी
तुला काय वाटलं मनुष्य बिमारीचा आहे कर्जदारी
तु भीती दाखवशील तर तो चटकन हार मानेल सारी
चुकी केली तु बनून मनुष्याच्या अस्तित्वाचा टिकाकारी
आता मनुष्य करायला लावेल तुला नमस्कार भारी
अरे आम्ही काढलीय लस आता मस्त धुवाधारी
आता तुझी लागली वाट याचे आम्ही साक्षीदारी
आता तू पडशील आमच्या पाया बनून रडकाधारी
लस घेऊन दाखवतो आम्ही विश्वाचे खरे अधिकारी.
