STORYMIRROR

kishor zote

Inspirational

4  

kishor zote

Inspirational

सर, जात काय असते ?

सर, जात काय असते ?

1 min
789


सर, जात काय असते ?


सर, जात काय असते ?

या प्रश्नाने मी हडबडलो

चिमुकली ती तिसरीची

निरागसपणे विचारत होती......


काय झाले ? असे का विचारते ??


आई म्हणते तुझ्या मैत्रीणी

हलक्या जातीच्या आहेत

त्यांच्या सोबत जेवू नको

खेळत ही जावू नकोस.....


आजही अशी मानसिकता

घराघरात असेल

तर सांगा कसे ?

वाहतील वारे पारिर्तनाचे.....


जाती अंताचा झेंडा

खांदी तर घेतलाय

पण कळेना नेमका

तो कोठे रोवायचा.....


तूला जे वाटतं ते तूर कर

या गोष्टींकडे लक्ष नको देवू

हसत निघाली मैत्रीणींसोबत

सर जात काय असते ???

प्रश्न मला विचारत....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational