STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational Tragedy

2  

Umakant Kale

Inspirational Tragedy

स्मृतीची चाळता पाने

स्मृतीची चाळता पाने

1 min
14K


स्मृतीची चाळता पाने, सरले वर्षे हो मागे

आठवणीचा पिठारा, लपली सुखे दु:खा मागे

जीवनाची व्यथा रचिली, झाले महाकाव्य

बघता मनुष्यी ,दुरावली माणसे हो मागे

बालपणी जगले बालपण, वयात येता मेले मन

घरघरात 

आपसी युद्ध, घरे आता राहिले मागे

कधी काळी समृद्धी गावे, नादंती खेळती संस्कारे

गावे झाली रिकामी, संस्कार आता मागे

नको रे मानवा चाळू ही स्मृतीची पाने

तुझ्यातच दडली कारणे, नको धावू सावलीच्या मागे

होऊन गेले संत मुनी, सांगून गेले मुखी वधी

जो जो करसी मिळे फळ तेसी, नको जावू अंधश्रद्धेच्या मागे

तसेच अनुभवले, मी पणात मन हरवले

कळून चुकल्यावर समजले, मी का राहिलो मागे ?

इतिहास हेच सांगतो,स्मृती चाळ म्हणतो

करून आभ्यास यश मिळेल, नको धावू आता स्मृती मागे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational