STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Romance Tragedy

3  

Sunil Khaladkar

Drama Romance Tragedy

शृंगार...

शृंगार...

1 min
378

मन सुंदर, म्हणून तिचं तन सुंदर,

निसर्ग ही तिच्यापुढे झुकतो....

रूप तिचे पाहिल्यावर जिथे,

शृंगार ही मुजरा करायला वाकतो...


नको लाली, नको बाली,

नको मेकअप आणि काजळ....

सूर्य, तारकांचं तेज ही कमी पडते इथे,

मग चंद्राची ही होते जळजळ....


देवाने दिलेले वरदान म्हणजे 

सुंदर, बोलके तिचे डोळे....

गालावरील तिची खळी पाहता,

दर्पण ही मनातून जळे......


माथ्यावरील बिंदी तिची,

आहे सौभाग्याची शान...

सर्व निसर्गातील शृंगारात,

भारतीय स्त्री आहे महान .....


लज्जा, शरम, अन साधेपणा,

हाच तिचा शृंगार आहे....

तिच्यावर जो टाकील वाकडी नजर,

मग ही साधी स्त्रीसुद्धा एक अंगार आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama