शंभुराजे
शंभुराजे
शंभुराजे
( सहाक्षरी )
शिवरायांसह
दिल्ली दरबारी
आग्रा ती सुटका
हिंमत हो किती !...१
आठव्याच वर्षी
नेतृत्व करती
सैन्य सोबतीला
हे सात हजारी.....२
प्रत्येक प्रांताची
भाषा ती शिकती
साधण्या संवाद
साऱ्या रयतेशी.....३
बुधभुषणम
स्वहस्ते रचती
ज्ञानाचे भांडार
चौदाव्याच वर्षी....४
स्वराज्याची जेंव्हा
ये जबाबदारी
तलवार चाले
ती अजिंक्य अशी....५
बारा आघाडयांचे
नेतृत्व करती
एकशे चाळीस
लढाया जिंकती....६
बहुभाषा तज्ञ
उत्तम हो कवी
कला विद्या ज्ञान
झटपट शिकी.....७
शिवरायांचेच
रक्त असे अंगी
सळसळते हो
या धाकल्या धनी....८
घात तो का झाला?
बत्तीसाव्या वर्षी
कोणता धर्म तो
शिक्षा देतो अशी......९
शंभुराजे असे
आमच्या त्या श्वासी
मुजरा करता
फुलते ती छाती.....१०
किशोर झोटे,
औरंगाबाद.
