STORYMIRROR

Swati Darekar

Children

3  

Swati Darekar

Children

शाळा सुरू झाली

शाळा सुरू झाली

1 min
414

कोरोनाच्या  महामारीने

माजला होता हाहाकार 

विसरुनच गेलो होतो 

सारा गुणाकार ,भागाकार .....१



दीड वर्ष जवळजवळ 

घरातच होतो बंद 

खेळ नाही, मित्र नाही 

झालो आम्ही मंद .......२


आज शाळा भरल्यावर

खूप मज्जा आली 

डिजीटल शाळेपासून

आमची सुटका झाली .....३


बूट आणि कपडे

झाले सगळे आपरे

तरीही शाळेत जायला 

भरले नाही कापरे .....४


इतिहासाच्या तासाला 

शिकलो पानिपतचा लढा

गणिताच्या तासाला 

शिकलो सतराचा पाढा....५


आता नाही म्हणणार 

कधी भोलानाथचे गाणे

शाळेत साचले तळे

तरी जाईल आनंदाने .....६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children