प्राण्यांची सभा (बालकविता)
प्राण्यांची सभा (बालकविता)
जंगलात भरली
प्राण्यांची सभा
गाढव होता मध्ये
सूचना करत उभा
सिंह अध्यक्ष तर
वाघ प्रमुख पाहुणा
कोल्हा लांडग्याला
अनुमोदन देऊ देईना
झाडाची सावली
त्याचाच मंडप
घाबरून बसले
कोणी मारेल झडप
कोणी कोणाला खाणार नाही
हा जंगल कायदा बदलाया
तावातावाने सारेच लागले
मग एकमेकांवर खेकसाया
जोराचा तो वारा आला
रिप रिप वाढली पावसाची
अध्यक्ष नि प्रमुख पाहुण्यांनी
घाई केली सभा गुंडाळण्याची