पांढरे कपाळ
पांढरे कपाळ
सीमेवर लढणं
शेतात राबणं
दोघांचं योगदान
देशासाठी
सीमेवर शत्रू
शेतात सावकार
दोघेही घातक
तयासाठी
लढती शौर्याने
पिकवती मोती
परि जाण नाही
तुम्हा आम्हा
विरमरण शहिद
आत्महत्या गळफास
होत असे भांडवल
श्रेयासाठी
शौर्याचे पदक
मदतीचा धनादेश
पांढरे कपाळ
विरहाचे
