STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational Romance

3  

Sunita Ghule

Inspirational Romance

ओढ तुझी

ओढ तुझी

1 min
670


काव्यांजली


ओढ तुझी


ओढ तुझी
लागली भगवंता मज
शोधते तुज
दिगंतरी।

धावा मुखाने
हृदयात आठवते नाम
सेवा निष्काम
करूनिया।

दुःखी दीनात
रूप तुझे पाहते
मदतीस धावते
परोपरी।

तुझ्या प्रेमसिंचनात
भिजव मज आता
तूच त्राता
जीवनात।

हरण दोषांचे
दाव मार्ग मुक्तीचा
ईश प्राप्तीचा
कृपावंता।


मनीचा कल्लोळ
शमवून दे अासरा
मायेचा पसारा
आवरूनी।


ओढ तुझी
आर्त व्याकूळ विनवणी
घ्यावे सामावूनी
चरणाशी।


सौ सुनिता घुले
अहमदनगर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational