नकळत
नकळत
मी होतोच तसा लाजरा बुजरा आणि एकाकी
पण कुणास ठाऊक का तुझ्यासाठी मी तसा नव्हतो
तू समोर असताना मला बरच काही बोलावंसं वाटे
आपली ओळख झाली ती माझ्या मित्रा मुळे
आणि आपण सर्व सुट्टीत एकत्र येत असू
खूप धमाल मस्ती आणि खेळ खेळत असू
तू खूप साधी सरळ आणि निरागस पण चंचल
एखाद्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्या सारखी
स्वच्छंद हुशार आणि सर्वांना घेवून चालणारी
पहिल्याच भेटीत मला तू अवडलीस मैत्रीण म्हणून
तुझा तेजस्वी चेहरा आणि नैसर्गिक सुंदरता
जितकी तू बाहेरून सुंदर होतीस तितकीच तू मनाने पण सुंदर होती
तेव्हाच असं ठरवलं लग्न करीन तर तुझ्यासारख्या मुलीशी
आपण सगळेच आता मोठे झालो
आपापल्या आवडीचा विषय निवडून
पुढे निरनिराळ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला
आपापल्या अभ्यासात व्यस्त होवून गेलो
कधीतरी सुट्टीत भेटलो तरी नेमकच बोलून
पुन्हा आपल्या अभ्यासात कामात लागून जात असू
ते बालपण ते खेळ आणि ती चंचलता आता राहिली नव्हती
पण त्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या होत्या
बऱ्याचदा वाटलं तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं
मनातल्या भावना व्यक्त कराव्या पण नको
अजून ती वेळ आली नाही म्हणून चूप राहिलो
पुढे उच्च शिक्षणासाठी मी दुसऱ्या शहरात गेलो
जाताना सगळ्या मित्र मैत्रिणींचा निरोप घेतला
तुझाही निरोप घेतला , वाटलं परत येवून बोलू
दोनच वर्ष ना ते आत्ता निघून जातील
तू आता एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली होतीस
अधून मधून मित्रांकडून सगळ्या बातम्या मिळत
तसं अभ्यासाचं दडपण पण खूप होतं
पण नकळत मी तुझ्या प्रेमात होतो कधीपासूनच
आणि अचानक एके दिवशी मनाची निराशा झाली
तुझं लग्न ठरल्याची बातमी कळली मित्राकडून
मनात धस्स झालं वाटलं आता सगळं संपलं
तेव्हापासून त्या विषयावर कधी बोललोच नाही
सगळं लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं
सगळ्यांशी संपर्क तोडून टाकले पुन्हा तुझी चर्चा नको
आणि माझं उच्च शिक्षण पूर्ण करून मी परतलो
आईबाबा आणि सर्व खूप खुश होते
मी संध्याकाळी मित्रांना भेटायला आलो
समोर तू ऑफिसमधून येताना दिसलीस
एक सुखद धक्काच बसला
तू माझ्याकडे पाहून हसली आणि
थोड्यावेळाने भेटू म्हणून निघून गेलीस
तुझ्या वागण्यात काहीतरी खटकले
पण जेव्हा उलगडा झाला तेव्हा कळले
तुझं ठरलेलं लग्न काही कारणाने मोडलं होतं
आणि त्याचं वाईट वाटावं की आनंद करावा ?
देव पण माझ्या बाजूने असावा असं वाटलं
पुन्हा तुला ऑफिस मधून येताना गाठलं
आणि नकळत तुझा हात मी हातात घेतला
आणि मनात काय आहे ते बोलून टाकलं
तू थोडी लाजली आणि परत भेटू म्हणून निघून गेलीस
मनाची घालमेल होत होती का कुणास ठाऊक
पण तरीही मनाला एक शांतता मिळाली होती
मनातलं बोलून एक आत्मविश्वास मिळाला
पुढे तू सगळं नीट जुळवून आणलेस
घरातील मोठ्यांच्या भेटी आणि स्वीकृती !

