STORYMIRROR

Supriya Devkar

Drama Romance

3  

Supriya Devkar

Drama Romance

मुखवटा

मुखवटा

1 min
172

का वाटावे आकर्षण 

सोबत असता प्रिय सखी 

दिसणे असते का वरचढ

सांग मला तुझ्या लेखी 

मनातल्या भावना समजणारे

डोळे बोलतात जेव्हा 

तुझ्या माझ्या नात्याला 

अर्थ उरतो तेव्हा 

चेहऱ्यावरची रंगरंगोटी 

आवडते का तुजला 

भाव तयाचे जाणावे 

वाटत नाही का तुजला 

समोर येतील किती ललना 

तोल ढासळू नको देऊस 

मुखवटा पांघरावा असे

कधीच नको वागूस

सोबत तुझी माझी स्मरून 

क्षणांची पोतडी उघड समोर 

बघ आठवेल प्रीत आपली 

राहतील स्वप्नं उभी समोर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama