STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational Tragedy Abstract

2  

Abasaheb Mhaske

Inspirational Tragedy Abstract

मरायचंच तर खुशाल मर …

मरायचंच तर खुशाल मर …

1 min
2.7K


कैकदा फाटले आभाळ , सोसला दुष्काळ

मनगटावर तुझा होता केवढा विश्वास

स्वतः अर्धपोटी तरीही तू सारा-यांनाच प्रेमाचा घास भरवलास

निसर्ग आणि नियतीपुढे तू कधी झुकला नाहीस 

           मरायचंच तर खुशाल मर ....त्याआधी परिस्थितीशी दोन हात कर

सततची नापिकी अन पाचवीला पुजलेली गरिबी

पोरीचं लगीन , पोराचं शिक्षण , सावकाराचा देणं

सारं- सारं आयुष्याचं गणित चुकत गेलं अन तू अविचारी बनलास

मरणाने प्रश्न सुटत नसतात रे .. तर ते अधिकच चिघळतात

      मरायचंच तर खुशाल मर ...पूर्वजांची मान अभिमानानं उंचावेल असंच मर 

मरण तर पळपुटेपणा , पळणे तुझ्या रक्तातच नाही ...

लढून मर पण जीवनयात्रा संपवून उरलेल्याना जित्यापणी नरक यातना देऊ नकोस

तुझ्या मदतीस याआधीहि कुणी आला नाही , अन नंतरही येणार नाही

जन्मभर सोसला वनवास , कायमच दुःख - दारिद्र्य तुला वारसान मिळालं

    मरायचंच तर खुशाल मर ..त्याआधी बायकोसहित चिल्या- पाल्यांची खोद कबर

पत्थराला तू पाझर फोडलास अन मातीतून मोती पिकवलेस ...

ओसाड माळरान फुलवून तूच आम्हास आशावादी जगणं शिकवलंस

जगाचा पोशिंदा तूच , तूच खरा जीवनाचा शिल्पकार बनलास...

अरे बाबा ! आयुष्याचं कोडं सोडवणं अवघड पण ...अशक्य मात्र कधीच नसतं

मरायचंच तर खुशाल मर .. पण त्या आधी वाघांसारख जागून बघ .. वाघासारख जागून बघ ...

  

   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational