STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Tragedy

2  

Pandit Warade

Inspirational Tragedy

मोल कष्टाचे

मोल कष्टाचे

1 min
14.6K


 मोल कष्टाचे आजवर न तुझ्या जाणले कुणी

तुझ्या मेहनतीवर बळीराजा, फिरतंय पाणी


तमा ऊन पावसाची नाही केलीस तू कधी

सोय पोटाची देखील ना पाहिलीस कधी 


रात रात जागलास, पिकांना द्याया पाणी

अंधाराची भीती कधी नाही धरलीस मनी 


घेऊनि पोटास चिमटा, धान्य पिकवतोस तू 

भूक अन्नाची साऱ्या जगाची भागवतोस तू 


जातोस घेऊनि माल विकावयास बाजारी

दाम योग्य कधीच पडत नाही हातावरी


साऱ्या जगाचा पोशिंदा का राहतोस उपाशी

तुझ्या जीवावर सारे रोज खातात तुपाशी 


आता ठरव तुझ्या मालाचा तूच बाजार भाव

धान्य दाबून ठेव, घाल यांच्या पोटावर घाव 


आत्मघाती अविचाराच्या नको लागूस नादी

गड्या त्यानेच घरादाराची नेहमी होते बर्बादी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational