मोकळे आकाश
मोकळे आकाश
लहान असतांना हवीहवीशी
आई वडिलाची अभिलाशा
मोठे झाल्यावर मुलांमुलींना
या पाहिजे मोकळे आकाश
जगण्याची रित समजवणारे
जणू होतात घरातले दुष्मन
स्वच्छंदी वावरायला त्यांना
पाहिजेत मोकळे हे अमन
मनात दाटलेले हे आभाळ
साठवून ठेवतात मनी गरळ
वेळ प्रसंगी ती भेटल्यास
भळभळ ओकतात सरळ.
कोपऱ्यात दडलेला राग
ह्रदयात कोंदून ठेवला
गैरसमज दुर झाल्यावर
रूसवा क्षम्य उडून गेला..
टिपून दाणे या चोचीमधे
माय चिमणी मुखी घालते
मोठे झालेत की पाखरू
भरकन आकाशी भरारी घेते.
माय शिकविते या पिलास
जीवनात कसे उडता येई
पंखात बळ येताच क्षणी
त्यास आकाश मोकळे होई.
माहेरात मोकळे आकाश
आहेत संसारात सप्तरंग
नांदत आहे खेळीमेळीने
भावंडे सर्व एकमेका संग.
खुप मैत्रीनी माझ्या माहेरी
खेळायचो खुप सावकाश
कांही झनी सासरी गेल्या
भेटता जणू मोकळे आकाश..
जीवन आनंदाचे सुंदर गाणे
मनसोक्त हसुनीया जगायचं
आयुष्यात संधी मिळे पर्यंत
मोकळ्या मनाने बागडायचं.
पखराला मनी कुणाची भिती
चाहुल लागली त्यास प्रितीची
भरवसा असते खऱ्या प्रेमावर
झेप बींदांस घेई आकाशाची.
निळ्या,काळ्या घन मेघातून
पडती सरसर पावसाच्या धारा
निसर्ग सजला इंद्रधनू रंगाने
झाला मोकळा आकाश सारा.
जीवन हे निसर्गाच्या आधीन
असे सृष्टी त्यापासूनच चाले
होता मोकळे आकाश इथे
मनी उल्हास सुंगधापरी फुले.
