मज वेड लागले सुरांचे
मज वेड लागले सुरांचे
( अष्टाक्षरी )
आहे जीवन सुंदर
गाणे गुणगुण त्याची
गाणे गाता गाता तर
सुर जुळतील सारी ॥१॥
आता सुरांची मैफल
भरवतो माझा मीच
दुःख सारे लोटा दूर
करा स्वतःवर प्रित ॥२ ॥
निसर्गाचे गुंज गीत
साठवून घेता मनी
काया वाचा देह तर
प्रित झंकारते हृदयी ॥३॥
तुझी माझी अशी साथ
सदोदीत बहरावी
क्षणी हमेशा प्रत्येक
साथ सुरांची जुळावी ॥४॥
