मी
मी
अक्षरांच्या वळणांवर
शब्दांच्या अंतरात
लपविले मी श्वास
काही काही आघात
कागदांवर शब्द थिटे
पुसट ओळींच्या ओळी
अर्थांची वलयं नेमकी
लुप्त सागरी खोली
आक्रंदन कालातीत
विसळले किती तास
ओले शब्द पानात काहीसे
काही ठेवले आत
हात थांबले क्षणी सावध
उलटावे हे पानं
उगवेन उद्याच्या सूर्याला मी
देईन नवे आव्हानं